श्रीमंत मराठा सरकारने गरीब मराठ्यांची वाट लावली – प्रकाश आंबेडकर

भंडारा : १७ डिसेंबर – श्रीमंत मराठा सरकारने गरीब मराठ्यांची वाट लावली, अशी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसंच ओबीसी आरक्षणवरुनही प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात लुडबुड करत ओबीसींचं राजकीय आरक्षण घालविल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणात लुडबुड करत आम्ही ओबीसींच्या बाजूने आहे हे दाखवू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला श्रीमंत मराठ्याचे सरकार अशी उपमा देत श्रीमंत मराठा सरकारने गरीब मराठ्यांची वाट लावली, अशी टीका आंबेडकरांनी केली.
महाविकास सरकारने ज्या प्रमाणे गरीब मराठ्यांची वाट लावली त्याचप्रमाणे ओबीसींचीही वाट लागली जातीये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने ओबीसी निवडणुकीबाबत स्पष्ट निकाल दिला असताना सरकारला निवडणुका रद्द करण्याचा काहीच अधिकार नाही, असंही आंबेडकरांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
गेल्या काही वर्षांमध्ये देशातील ओबीसी समाजाचं जे आर्थिक उत्थान झाले आहे, त्यांना सरकारमध्ये जे काही प्रतिनिधित्व मिळालं आहे, ते आगामी काळात टिकवायचे असल्यास या समाजाने स्वत:ची भूमिका घ्यायला शिकले पाहिजे. धर्मांध पक्षांची कास सोडून स्वतंत्रपणे वाटचाल सुरु केली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Leave a Reply