काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच देवेंद्र फडणवीस गोव्यात डेरेदाखल

पणजी : १७ डिसेंबर – काल काँग्रेस पक्षाने आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली. राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची घोषणा केली आहे. तलिगावमधून टोनी रोड्रिग्स, पोंडा येथून राजेश वेरेनकर, मर्मुगावमधून संकल्प अमोनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कर्टोरिम येथून एलिक्सो रेजिनाल्डो लारेन्सो हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी २०१२ ते २०१७ दरम्यान मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते गोवा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मरगावमधून दिगंबर कामत आणि कुनकोलिममधून यूरी अलीवामो हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मापुसा विधानसभा क्षेत्राचे सुधीर कानोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Leave a Reply