यवतमाळमध्ये रुग्णवाहिकेतून गुटख्याची तस्करी

यवतमाळ : १६ डिसेंबर – गुटका तस्करीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे यामधून कोट्यावधीची उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेकांनी या अवैद्य व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून मिळणारा काळा पैसा पांढरा करणारा वर्गही वेगळा आहेत. दरम्यान, तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळ गुटका घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णि रोडवर तपासली तेव्हा हे सत्य बाहेर आले.
आर्णि येथून एमएच-२९-टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयसमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहिती वरुन ही रुग्णवाहिका थांबवली. रात्री या रुग्णवाहिकेत पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये सीटच्या खाली गुटख्याची तीन पोती दडवलेली आढळून आली. त्यानंतर रुग्णवाहिकेत प्रदीप थावरा राठोड(२७), सय्यद सय्यद उमर(२४) रुग्णवाहिका चालक अनिल डुडेकर (२३)रा. अमराईपुरा आर्णी यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी अन्न निरीक्षक घनशाम दंदे यांच्या तक्रारी वरुन कलम २७२, २७३, ३२८,३४ भांदवी तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील २६(२)२७,३०(२)(ए)५९ या कलमानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास लोथे ,संदीप मेहेत्रे, रुपेश नेवारे ,विकी राऊत, जांभुळकर आदींनी केली

Leave a Reply