वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

गर्दभाचार्यांचे हिंदुत्व !

ज्याचा आजा एक खान आहे !
ज्याची माय एक विदेशी ख्रिस्ती आहे !
ज्याने स्वतः बाप्तिस्मा घेतलेला आहे !
ज्याच्या अंतःकरणात राम नाही तर रोमचा वास आहे !
जो स्वतः पन्नास वर्षांचा एक मंदबुद्धी बालक आहे !
तो जेव्हा हिंदू आणि हिंदुत्वावर आपलं दिव्य ज्ञान पाजळतो ,
तेव्हा त्याला मी जगातला सर्वात मोठा विनोद समजतो !
तो म्हणतो, हिंदू आणि हिंदुत्व वेगळे आहे !
अहो गर्दभाचार्य महाशय ,
हिंदूंमधून हिंदुत्वाला वेगळं करणं म्हणजे ,
शरीरातून आत्म्याला वेगळं करणं आहे ,
नदीतून पाण्याला वेगळं करणं आहे ,
मानव आणि मानवता जसे एक आहेत,
पुरुष आणि पौरुष जसे एक आहेत ,
तसेच हिंदू आणि हिंदुत्वही एक आहेत ।
अर्थातच तुझ्यासारख्या रोमभक्ताला हा हिंदुत्वाचा अर्थ काय कळणार म्हणा !
शक्यच नाही ते !
म्हणून , मी सांगतो ते तू ऐकून घे ,
अरे, हिंदुत्व म्हणजे ,”वसुधैव कुटुंबकम् ” आहे,
हिंदुत्व म्हणजे ” आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वत:” आहे !
हिंदुत्व म्हणजे ,” सर्वेपि सुखीन: सन्तु “आहे!
हिंदुत्व म्हणजे, ” एकं सत विप्र: बहुधा वदंती ” आहे !
हिंदुत्व म्हणजे “ओम शांती: शांती: शांती: ” हा विश्वशांतीचा शांतीपाठ आहे !
हिंदुत्व म्हणजे सहिष्णुतेचा कळस आहे !
हिंदुत्व म्हणजे केवळ मानवाच्याच नव्हे तर ,समस्त चराचराच्या सुखसमृद्धीचा, योगक्षेमाचा जाहीरनामा आहे !
हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानचा आत्मा आहे !
अर्थातच हे सर्व तुझ्यासारख्याच्या आकलनशक्तीच्या पार पलीकडचं आहे !
आणि म्हणूनच मला अजिबात आश्चर्य नाही वाटत तू जे बरळतोस त्याचं !
पण आश्चर्य वाटते ते आमच्याच हुच्चशिक्षित हिंदू बांधवांचं !
ज्यांना तुझी ही हर्बल गांजाच्या नशेतिल
असंबद्ध बडबड म्हणजे जणू विद्वत्ताप्रचुर बौद्धिक वाटते !
म्हणून, मी तुला आणि तुझ्या या जयचंदवंशी आणि वाममार्गी समर्थकांना ,
ढोपरापासून नमस्कार करतो !
तुर्तास तरी मी फक्त इतकंच करू शकतो !

     कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply