विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा – चंद्रकांत पाटील यांचे महाआघाडीला आव्हान

पुणे : १४ डिसेंबर – निवडणुका बिनविरोध करू असा शब्द काँग्रेसने न पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकात भाजपला मोठं यश मिळालं आहे. आम्ही महाविकास आघाडीची मत फोडली, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरियाना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खर श्रद्धा आणि सबुरीच फळ मिळालं आहे, असंही ते पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना म्हणाले.
“काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवलं आहे. आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा. कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका”, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.
नागपूर निवडणुकीत ऐनवेळी घोडेबाजार होऊन देखील भाजपाचाच विजय झाल्याचं दरेकर यावेळी म्हणाले. “नागपूर आणि अकोल्याच्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून ज्या निवडणुका झाल्या, त्यात राज्यातील जनतेनं प्राधान्य भाजपाला दिलं. नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपालाच पाठबळ असल्याचं दाखवून दिलं. वसंत खंडेलवाल यांच्याकडेही वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत”, असं दरेकर म्हणाले आहेत.

Leave a Reply