वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

आरती शरदभाऊ ..

काल देशाच्या आजन्म भावी पंतप्रधानाचा वाढदिवस झाला ! त्यानिमित्त त्यांची ही आरती …

आरती काका काऊ…..

आरती काका काऊ ।
सोनियासी शरण जाऊ ।।

स्वाभिमानी तुम्ही किती
खुर्चीसाठी खाता माती
खुर्चीच्या प्राप्तीसाठी
कोणत्याही थरा जाऊ ।।

कृषीमंत्री होता तरी
जीव देती शेतकरी
नव्हती तुम्हा याची खन्त
तुम्ही क्रिकेटमधे मस्त ।।

शकुनीही फिका पडे
पाहुन तुमचे हे चाळे
मनातले तुमच्या कधी
कोणाच्या ना बापा कळे ।।

पोर,पुतणे नि नातू
केवळ यांची तुम्हा चिंता
स्वार्थासाठी चिवडता
जातीपातीचा तो गुंता ।।

गुण तुमचे किती गाऊ
तुम्ही सरड्यांचे ताऊ
खंजीर हि ओळख तुमची
नारा जाऊ तिथे खाऊ ।।

वारे तुमचा राष्ट्रवाद
देशद्रोह्यांपाठी हात
देशभक्तांचाच सच्या
करता तुम्ही सदा घात ।।

नाना रंग ढंग तुमचे
परी अतरंगी काऊ
घड्याळाचे काटे तुमच्या
आता उलटे लागले धावू ।।

   कवी -अनिल शेंडे 

Leave a Reply