उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा नवाब मालिकांचा आरोप

मुंबई : १४ डिसेंबर – नागपूर आणि अकोला या दोन्ही जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. मात्र हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात विधान परिषदच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार थांबवायचा असेल तर कायदा करण्याची गरज असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेतील निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारे घोडेबाजार होत होता. हा घोडेबाजार थांबावा म्हणून संसदेत कायदा करण्यात आला. राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा आहे. त्याचप्रकारे विधान परिषदेमध्ये देखील कायदा करण्याची गरज आहे. याबाबत राज्य सरकार कायदा करू शकणार असेल तर येणाऱ्या काळात राज्य सरकार कशी पावले उचलणार. मात्र राज्य सरकारच्या अधिकारात कायदा करणे शक्य नसेल. तर, केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून कायदा करावा. जेणेकरून भविष्यात विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार होणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे असं मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply