वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पुरोगामी = ब्रिगेडी !

साहित्याच्या सम्मेलनात एका पुरोगामी संपादकाचं
ब्रिगेड्यांनी तोंड काळं केलं !
कोणी काहीही म्हणो , पण ,
हे काही चांगलं नाही झालं !

तसं त्या संपादकाला आणि समस्त पुरो पत्रकारांनाही याच फारसं वाईट नाही वाटलं !
कारण,या विषयावर वाहिनी-विश्वात
कुठलंही वादळ नाही उठलं !

तसं पाहिलं तर हे एक
चार भिंतीतलं नाटक आहे !
कारण, ब्रिगेडी आणि पुरोगामी
हे एकमेकांचे सहोदरच आहेत !
त्यांचा केवळ काकांचं नव्हे
तर बाप सुद्धा एकच आहे !

पण तरीही पुरोगाम्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कदापिही गदा येता कामा नये
त्यांची कधीही अशी मुस्कटदाबी होऊ नये
त्यांनी दुसऱ्यांची केली तर त्याला कोणी आक्षेपही घेऊ नये !

कारण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांचा
संपूर्ण एकाधिकार आहे !
तसेच कोण पुरोगामी आणि कोण प्रतिगामी हे ठरवण्याचा अधिकारही त्यांनाच आहे !

त्यांच्या लेखी संविधानावर नाही तर शरियावर विश्वास असणारे ,
महिलांना बुरख्याची सक्ती करणारे,
तीन तलाक आणि हलालाचं समर्थन करणारे ,
एका पुस्तकाच्या शिवाय सारं ज्ञान झूट, फालतू, आहे , असे म्हणणारे सुद्धा पुरोगामी असतात !
पण , सावरकरांसारखे समस्त पुरोगाम्यांचे बापसुद्धा प्रतिगामी ठरतात !

म्हणून , हे प्रकरण म्हणजे एक लुटुपुटूची लढाई, किंवा नूराकुस्ती समजावे !
किंवा, सालाबादाप्रमाणे सम्मेलनाच्या
मनोरंजनीकरणाचाच भाग समजावे !

           कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply