प्रियकरानेच केला प्रेयसीवर अत्याचार

नागपूर : १० डिसेंबर – प्रियकराने त्याच्या प्रेयसीला शरीरसुखाची मागणी केली. परंतु, त्यास प्रेयसीने त्याला नकार दिला. अशातच त्यांच्यात वाद झाले आणि तिने ब्रेकअप घेतला. या रागात प्रियकराने प्रेयसीच्या घरी कुणीही नसल्याचे बघता तिच्या घरात शिरला आणि तिने पुन्हा शरीरसुखाची मागणी फेटाळल्यानंतर त्याने बळजबरी तिच्यासोबत अत्याचार केला. या प्रकरणी पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक प्रमोद उईके असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही १८ वर्षांची आहे. तिला वडील नसून आई आणि मोठा भाऊ आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असून, ते नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीत भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. भाऊ हा हातमजुरीचे कामे करतो. दरम्यान, पीडितेची अभिषेकसोबत काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. दोन महिन्यांपूर्वी ते एकमेकांचे मित्र झाले. अभिषेक हा मूळचा भंडारा येथील रहिवासी असून, तो मामाकडे वाडी परिसरात राहत होता. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. परिस्थिती बेताची असल्यामुळे आरोपीने तिला एक मोबाईल आणि सीमकार्ड घेऊन दिले. या मोबाईलच्या माध्यमातून त्यांचे लवकरच बोलणे सुरू झाले. अशातच त्यांची मैत्री ही प्रेमात बदलली. यादरम्यान, आरोपी अभिषेकने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु, अभिषेकची ही मागणी पीडितेने नाकारली आणि तिने त्याच्यापासून ब्रेकअप घेतला. यातून त्यांच्यात वादाचे खटके उडायला लागले. याच रागाच्याभरात अभिषेकने पीडितेच्या घरात जाऊन तिला घेऊन दिलेला मोबाईल फोडला आणि निघून गेला. यानंतर अभिषेक हा तिच्या घरी सीमकार्ड परत करण्यासाठी तगादा लावत होता. अशातच, ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास तो पीडितेच्या घरी आला. यावेळी ती घरात एकटीच होती. अभिषेकने घरात शिरून तिला सीमकार्ड परत मागितले आणि घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला.
पीडितेने तिच्या आई आणि भावाला झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी अभिषेक उईके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Leave a Reply