कॉमहॅड आणि बीएपीआयओतर्फे उद्यापासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नागपूर : ९ डिसेंबर – दी कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॅबिलिटी अर्थात कॉमहॅड तथा ब्रिटीश असोसिएशन ऑफ फिजिक्स ऑफ इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ) युनायटेड किंगडम यांच्या संयुक्त विद्यमाने युनिसेफ, डीएमईआर, कॉमनवेल्थ फाऊंडेशन अँड कॉमनवेल्थ हेल्थ प्रोफेशन अँड पार्टनर्स यांच्या सहकार्याने १० ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सन १९८३ मध्ये युनायटेड किंगडम येथे कॉमहॅडची स्थापना झाली. सुमारे ५४ देशांचा समावेश कॉमनवेल्थ फाऊंडेशनमध्ये असून, जागतिक पातळीवर आरोग्य विषयक विविध गोष्टींवर कॉमहॅड भर देत असते. प्रत्येकाला चांगले आणि सुदृढ आरोग्य प्राप्त व्हावे असेही कॉमहॅडचे उदात्त धोरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेशी सन १९९० पासून कॉमहॅड जुळली असून, अनेक विषयावर सोबत कामही केले आहे.
परिषदेच्या यशस्वीतेकरिता अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश मेहता, कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर, वैज्ञानिक सल्लागार डॉ. मृदूला फडके, सचिव डॉ. बिजू सायमन, परिषदेच्या संयोजिका डॉ. प्राजक्ता कडूस्कर, डॉ. जया शिवलकर, डॉ. प्रकाश उके, डॉ. अविनाश गावंडे आदी मंडळी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. जागतिक पातळीवरील या परिषदेत सुमारे ५०० पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत चालु घडामोडीवरील विषय हाताळले जाणार आहेत. १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या काळात न्यूट्रीशन चॅलेंजेस इन चॅलेंज चिल्ड्रन इन कोव्हिड-१९ अँड पोस्ट कोव्हिड-१९ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. संपूर्ण परिषद ही आभासी अर्थात ऑनलाईनच्या धर्तीवर होणार आहे. कोरोनाचे संकट पाहता आयोजकांनी आभासी पद्धतीने परिषद घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान याच पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात ईसीडी अर्थात अर्ली चाईल्डहुड डेव्हलपमेंट हा विषय कार्यशाळेत हाताळला जाणार आहे. नागपुरातील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे हे १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ८.३० ते १२ पर्यंत थेट शस्त्रक्रिया कशा होतात यावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. सोफिया आझाद, डॉ. उमंजली दमके, डॉ. मुंधडा हेही सहभागी होणार आहेत.
दरम्यान मुख्य परिषद ही ११ व १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आभासी पद्धतीने सुरूच राहणार आहे. कोरोनानंतरची परिस्थिती आणि आव्हाने हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय असून, त्या सभोवतालच सर्व मान्यवरांचा भर राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे औपचारिक उद्घाटन ११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता आभासी पद्धतीने होणार आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर राहणार आहेत. याशिवाय डॉ. नवीन ठाकर, प्रो. के. श्रीनाथ रेड्डी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
कॉमहॅड तथा बीएपीआयओच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील डॉ. अविनाश सुपे, डॉ. मनोज तलापल्लीवार, डॉ. प्रमिला मेनन, डॉ. भारती कुळकर्णी, डॉ. सुषमा सावे, डॉ. बकुल पारेख, डॉ. चेतन शाह, डॉ. समीर दळवी, डॉ. प्रशांत करीया, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. हिमा बिंदू सिंह, डॉ. दीपा भास्करन, डॉ. प्रमोद जोग, डॉ. शेखर शेषाद्री, डॉ. सुनंदा कोली रेड्डी, डॉ. सी.पी.रवीकुमार, डॉ. मनिषा देशपांडे, डॉ. लिना देशपांडे, डॉ. मिनाक्षी वानखेडे, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. जया शिवलकर, डॉ. चित्तरंजन यागनिक, डॉ. एम.के.सी. नायर, डॉ. नंदीनी मुंदकूर, डॉ. मृदूला फडके, डॉ. अभय शाह, डॉ. प्राजक्ता कडूस्कर, डॉ. शेफाली गुलाटी, डॉ. अमिता वंजारी, डॉ. प्रियंका रायकर, प्रो. एच.पी.परमेश, डॉ. छाया प्रसाद, डॉ. शुभदा खिरवडकर आदी तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी व्हावी म्हणून नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टर अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply