वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

…बाकी सर्व ठीक आहे !

मामुंच्या वडिलांचा स्वर्गातून आला फोन !
मामु म्हणाले पीएला ” बघ रे बोलतंय कोण “
पीए म्हणाला,” फोन तुमच्या पिताश्रींचा आहे ,
स्वर्गातून तुमची ते खुशाली विचारताहेत “
“हॅलो बाबा हॅलो ,काळजी करू नका माझी
माझी सर्व काळजी वाहतात बारामतीचे का(का)जी !
मी मस्त छान मजेत आहे
थोडं इकडलं तिकडलं सोडलं , तर,
बाकी सर्व ठीक आहे !

पण आताशा या खुर्चीत मला थोडं अस्वस्थ वाटतं !
माझ्या भोवताल पिंगा घालतात ‘त्या’शेतकर्यांची भुतं !
एसटीवाल्यांचे आत्मेही दिसतात जिथं तिथं !
साधूंच्या किंकाळ्यांचे ध्वनीही येतात मधनं मधनं !
वाझेच्या विचारांनीही कधी कधी थरथरायला होतं !
पण आपले नॉटी आणि अरब सारं सलटवत आहेत
थोडं इकडलं तिकडलं सोडलं तर
बाकी सर्व ठीक आहे !

आपले काही मंत्री संत्री गेले आहेत जेलात !
काही वीर लढत आहेत खालच्या वरच्या कोर्टात !
महिलांवर अत्याचार नेहमीच होत असतात
गुन्हेगार सापडत नाहीत फिरतात मस्त मोकाट!
पोलिसांना वसुलीच्या कामावर लावलं आहे !
मी तर सुट्टी घेऊन घरीच बसलो आहे !
नागपूरकरांचं अधिवेशन हायजॅक केलं आहे !
थोडं इकडलं तिकडलं सोडलं तर
बाकी सगळं ठीक आहे !

कोरोनाचं संकट पुन्हा उभं ठाकलं आहे !
मी आशाळभूत नजरेने वरती बघतो आहे !
खापर फोडायला बळीचा बकरा शोधतो आहे !
दोन्ही हातांनी सध्या मिळेल ते सावडतो आहे !
कोणी हिरवा म्हणो लाचार म्हणो काही वाटेनासं झालं आहे !
दुसऱ्या ‘ मातोश्री’ वर सध्या लक्ष केंद्रित करतो आहे !
नवा आधार शोधतो आहे, पप्पूचे पाय धरतो आहे !
थोडं इकडलं तिकडलं सोडलं तर ,
बाकी सर्व ठीक आहे !

           कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply