पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

पुणे : ६ डिसेंबर – राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात गोळीबार करून तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा हॉटेलसमोर दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केला आहे. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मनूर शेख असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे.
समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काँग्रेस पक्षाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीरवर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार घडला आहे. दरम्यान शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply