किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे जोरदार स्वागत

रायगड : ६ डिसेंबर – महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर पोचले आहेत. राज्यपाल भगतसिग कोश्यारीही त्यांच्या सोबत आहेत. छत्रपती खासदार संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे यांनी त्याचे स्वागत केले. आमदार भरत गोगावले, योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आदी यावेळी उपस्थित आहेत. हेलिकॉप्टरने पाचाड येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती रोपवेने किल्ले रायगडावर पोहचले.
किल्यासह पंधरा ते वीस किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मेघडंबरी,जगदीश्वर तसेच समाधी स्थळाला आकर्षित फुलांची सजावट तसेच रोषणाई ही करण्यात आलेली आहे.

Leave a Reply