नागपूर महापालिकेची १०० टक्के लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी यशस्वी वाटचाल

नागपूर : ४ डिसेंबर – नागपूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने विविध शक्कली लढवत कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली. पहिल्या डोजचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाटचाल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल पाच लाख लोकांचे लसीकरण करण्यात यश आल्याने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठे यश मिळवले आहे. यातच ९७.८८ टक्के नागरिकांनी पहिला तर, ६०.६७ टक्के नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने हे उद्दिष्ट कसे गाठले ते जाणून घेऊ.
नागपूर शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी किंमत मोजावी लागली. ही किंमत पैशात नसून लोकांच्या जिवाने मोजावी लागली होती. त्यामुळे, दुसऱ्या लाटेतून लोकांचे जीव वाचवणे असो की, अनिश्चित असलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका, यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय होता. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम नागपुरात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन, नंतर हळूहळू वयोगटानुसार नागरिकांना लस मिळायला लागली. लोकांनी रांगेत उभे राहून लसीकरण्याच्या मोहिमेला प्रतिसाद दिला. पण, मागील दोन तीन महिन्यांची परिस्थिती पाहता अनके लोक या मोहिमेपासून दूर राहिले. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत ओढून आणण्यासाठी विशेष प्रयत्न नागपूर मनपा आणि आरोग्य विभागाला करावे लागले.
नागपूर मनपाच्या क्षेत्रात १५० च्या वर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. केंद्रावर सोयी सुविधा, लसीचा तुटवडा, नागरिकांचा गोंधळ या सगळ्यांत मोठ्या संख्यने लसीकरण झाले आहे. यात मागील ऑगस्टपर्यंत जे लोक लसीकरण केंद्रावर येत नव्हते त्यांच्यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ‘हर घर दस्तक’ या मोहिमेतून नागरिकांचे लसीकरण सुरू केले. यामध्ये १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत चार लाख ९६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले. यात २ लाख ५२ हजार ८५० जणांनी पहिला डोज घेतला. त्यासोबतच २ लाख ४३ हजार ४३४ जणांनी दुसरा डोज घेतला आहे. यात ३० नोव्हेंबर पर्यंत ३० लाख ८० हजार ३०७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. तेच २ डिसेंबर (गुरुवार) पर्यंत १९ लाख ३१ हजार ६३० म्हणजेच, ९७.८८ टक्के तर, ११ लाख ८९ हजार ४२० नागरिकांनी म्हणजेच, ६०.६७ टक्के नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यात एकूण ३१ लाख १३ हजार ८५९ जणांना वॅक्सिन देणे झाले होते.

Leave a Reply