अल्पवयीन प्रेमीयुगुलाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

भंडारा : ४ डिसेंबर – इयत्ता बारावीत शिकणा-या एका प्रेमीयुगुलाने शेतशिवारातील झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी साकोली तालुक्यातील सुंदरी येथे उघडकीस आली. कोमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
शेतशिवारात कामाकरिता गेलेल्या शेतकरी, शेतमजूरांना शनिवारी सकाळी एकाच झाडाला युवक व युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी झाली. यानंतर साकोली पोलिसांनाही घटनास्थळ गाठले व पंचनामा करून दोघांचाही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले. पोलिसांच्या चौकशीत दोघेही मृतक हे साकोली येथील नम्रता कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीचे विद्यार्थी असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा यावेळी नागरिकांकडून केली जात होती.

Leave a Reply