वाशिममध्ये भारिपच्या २३ नगरसेवकांचा, नगराध्यक्ष व शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

वाशिम : ३ डिसेंबर – कारंजा नगर पालिकेतील विद्यमान भारिपचे १९ नगरसेवक तसेच, मानोरा नगर पंचायतीचे ४ नगर सेवक व माजी नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमांतर्गत माजी जि.प. सभापती वाशीम व माजी नगराध्यक्ष हेमेन्द्र ठाकरे, कारंजा नगर परिषद उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, सत्ताधारी गटनेते व सभापती अँड. फिरोज शेकूवाले, नगरसेवक सलीम गारवे, अ. एजाज अ. मन्नान, चांद शाह, जावेद्दोदिन शेख, इरफान खान, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, अब्दुल राशीद, जाकीर अली, आरिफ मौलाना, सैय्यद मुजाहिद, निसार खान, डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, सोहेल अन्सारी, अब्दुल बशीर, शेषराव राठोडसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply