साहेब , दीदी आणि गुलाम !
बंगालची दादा दीदी साहेबाच्या भेटीस आली
” भावी पंतप्रधान ” उपाधित अजून एकाची भर पडली !
साहेबाचा गुलामसुद्धा तेच स्वप्न पहातोय हल्ली !
साहेब मात्र म्हणतात त्याला सध्या सांभाळ तुझीच गल्ली !
दोन हजार चोवीससाठी सारी जुळवाजुळव सुरू आहे !
पण जख्ख म्हातारीच्या भाळी उपेक्षेचा आहेर आहे !
शून्यांची मोट बांधून हाती काहीच येत नसते !
युद्धामद्ध्ये बृहन्नडांना तसे काहीच मोल नसते !
हिरव्या सापांच्या भरोश्यावर युद्ध जिंकता येत नसते !
साप केवळ पाळणार्याच्याच सर्वनाशाचं कारण असते !
प्रधानपदाची स्वप्न पहायला कोणाचीही हरकत नाही
पण देशाला असा प्रधान चालणारच
नाही , ज्याला राष्ट्रगीतही येत नाही !
राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्याला सांगा खुर्ची कशी मिळेल !
त्याची जागा तर केवळ तिहार जेलमधेच असेल !
नवा हिरवा गुलाम जरी देशद्रोह खपवून घेतो !
हा राष्ट्रपुरुष मात्र त्याला पराभवाचाच शाप देतो !
कवी -- अनिल शेंडे .