छापता छापता छापे… – माधव पाटील

वृत्तपत्र विश्वाबद्दल बोलाय चं झाल्यास पुर्वीचा छपाई चा काळच खिले जोडण्याचा होता. बातमीत वा लेखात काही गडबड वावडे वाकडे शब्द छापून आले तर तो मुद्रा राक्षसाचा विनोद गण ल्या जाई. या राक्षसांच्या मुद्रण अत्याचारात मग दैनिका सोबत साप्ताहिक सुद्धा नागवल्या जायचे पण ते त्यावेळी क्षम्य मानले जाई.पुसद सारख्या छोट्या गावात एक विद्वान ऍड त्र्यंबकराव शुक्ल होते त्यांनी बराच काळ हस्त लिखित साप्ताहिक चालवले पण त्यात चूक नसायची वा दोष द्यायला जागा नव्हती पुढे त्यांचीच री तत्कालिन डॉ द. शं सरनाईक यांनी व्रत म्हणून साप्ताहिक ज्वालामुखी चालविले. हस्त लिखिता पासून ते खिळे जोडणा-या काळात चालवले.त्यात एक खुमासदार सदर होते ‘असे कळते की, ‘त्यात कान उघाडणी असायची पण कुणाचा अवमान वा अपशब्द चुकून नव्हते ते जातीने प्रुफ तपासत.त्र्यंबकराव शुक्ल यांना तर पत्र पंडित ग.त्र्यं. माड खोलकर यांनी त.भा.त येण्याची ऑफर दिली होती असे म्हणतात,असो मुद्रण दोषा संबंधी एक किस्सा आठवतो.माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यवतमाळ जि. प.चे अध्यक्ष (1972-77)असताना सोनाली ललित मासिक चालू केले होते दरम्यान पुसदचे भाऊ राजे यांचेजय ध्वज या साप्ताहिकातून एका कार्यक्रमाचे वृत्त छापून आले त्यात मा. सुधाकरराव हसून म्हणाले असे शब्द पाहिजे होते.पण मुद्रा राक्षसा ने ‘स’ चा ‘ग’ केला. ही चूक मोठ्या मनाच्या सुधाकर राव यांनी पुढे हसून मान्य केली.हा त्या काळी एक मोठ्ठा इनोद झाला ,असो.पण….अलीकडे या बदलत्या वेगवान यंत्र तंत्र युगाच्या वेगवान काळात छपाईचे जुने खिळे यंत्र बदलले. आज छपाई तंत्र खूप सुलभ झाले.पण याकडे दुर्लक्ष करणा-या झोपिवंत यंत्रणांना काय म्हणावे बरे अं कुणी सांगावे?मुंबईचे सारंग दर्शने यांनी म्हटल्या प्रमाणे हा वाह्यातपणा नक्किच आहे. काय टाईप होते,भलतच काही टाईप होत असेल तर त्यासाठी पुन्हा वेगळी मंडळी राबवावी लागते की काय कुणास ठावूक पत्रकार वा वार्ताहरांकडून अशा चुका होत नाहीत अन अनवधानाने झाली तर ‘वरचे’कशासाठी आहेत.तिमिराकडून अंधाराकडे लिहिण्यासाठी का?बोला बोला…खरं तर मुद्दामहून हा घाणेरडेपणा करणा-यास क्षमा नसावी असे मला वाटते.परवा परवा तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेवर दोन आठवड्या पूर्वी गर्भाशयाच्या मणक्यांची शस्त्रक्रिया झाली असेहि वाचण्यात आले त्यावरुन गदारोळ उठला हा शुद्ध खोडसाळपणा आहे म्हणून हा पत्र- प्रपंच.

-माधव पाटील

Leave a Reply