गुजरातमध्ये समुद्रात १५ बोटी बुडाल्याची शक्यता, १० मच्छिमार बेपत्ता

गुजरात : २ डिसेंबर – गिर सोमनाथ परिसरात बुधवारी रात्री सातत्याने पाऊस सुरू आहे. तसेच या परिसरात जोरदार वारेही वाहत आहे. त्यामुळे या भागात १० ते १५ बोटी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत बोटीमध्ये मच्छिमारही होते त्यातील १० मच्छिमार बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे गुजरात परिसरात मोठ्या प्रमाणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जोरदार वाऱ्यामुळे उना समुद्रात १५ बोटी बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चार मच्छिमार हे किनाऱ्यावर परतले आहेत. तर काही जण अद्याप बेपत्ता झाले आहेत. यामुळे मच्छिमारांचे आणि बोटींचे खूप मोठे नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

Leave a Reply