उमरेड वनपरिक्षेत्रात आढळले वाघाचे शव

नागपूर : १ डिसेंबर – दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात वाघाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सदर वाघ हा नर असून तो ८ ते १0 वर्षांचा होता. मौजा मानोरा शेत सर्व्हे क्रमांक १६ महेश कोठीराम पोपटकर यांच्या शेतात या वाघाचे शव आढळून आले.
वनकर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या आधारभूत मानक प्रणालीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासमक्ष कार्यवाही पार पाडली. त्यानंतर मृत वाघाच्या शरीराचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी उमरेड, डॉ. सर्मथ, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. बिलाल अली व डॉ. लियाकत खान यांनी केले. प्राथमिक अंदाजानुसार वाघाची शिकार झालेली नसावी. वाघाचे सर्व अवयव जसे- कातडी, नखे, सुळे दात, इतर दात, पाय, शेपूट पूर्णपणे शाबूत आहेत. तसेच कातडी व बाहेरील अंगावर कुठलेही विद्युत प्रवाहाचे खुणा दिसून आल्या नाही. विद्युत लाईन घटनास्थळापासून सुमारे २00 मीटर अंतरावर दिसून आले. वाघाच्या उजव्या बाजूस रिब्सबोन्स डॅमेज झाल्याचे दिसून आले. यावरून झटापट, विषाणुजन्य रोगामुळे किंवा सर्पदंशामुळे वाघ दगावलेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. मात्र, जोपयर्ंत शवविच्छेदनाचा अहवाल येत नाही तोपयर्ंत वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे वनविभागातर्फे कळविण्यात येत आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, डॉ. भारतसिंह हाडा, विभागीय वन अधिकारी (दक्षता), नागपूर वनवृत्त, नागपूर प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक (जंकास -२), उमरेड, नरेंद्र चांदेवार आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर व राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, मानद वन्यजीव संरक्षक, निखिल कातोरे यांच्यासमक्ष कार्यवाही पार पाडली

Leave a Reply