वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

यांचं असं कां होते ?

काल परवा या महाराष्ट्राने एक अनोखा व्हीडिओ पाहिला !
त्यात एक नॉटी कँपौंडर काकपुत्रीच्या कंबरेत हात घालून थिरकताना दिसला !
खूप दिवसांपासून डान्सबार, तमाशे वगैरे बंद असल्याने लोक त्याला मुकले होते !
पण त्या व्हीडिओने मात्र सारे कसे सुखावले होते !
यावरून काही लोकांनी मात्र खूपच अकलेचे तारे तोडले !
काही म्हणाले, काय मस्त खास दार जोडी आहे ! मस्त हिट होऊ शकते !
जर एखाद्या चित्रपट निर्मात्याने मनात आणले !
काही म्हणाले ,काकांनंतर याला जन्मभर तिच्याच तालावर नाचायचे असल्याने ही फक्त प्रॅक्टिस आहे !
खरा खेळ तर पुढे होणार आहे !
कुणी म्हणाले, वाघाला आपल्या टोळीत सामावुन घेण्याची बारामतीकरांच्या करामतीची ही घडी आहे !
ते काहीही असो, नृत्य मात्र बहारदार झाले !
कोरोनाच्या आगीत पोळलेल्या,
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या त्याच त्या बोअर बातम्या ऐकणाऱ्या सामान्य माणसाचे ,
आनंदाच्या चार क्षणांना आसुसलेल्या
जीवांचे ,
घटकाभराचे का होईना मनोरंजन झाले !
पण एक नतद्रष्ट कवी मात्र उगाचच बरळत होता ,
लोकांच्या कानीकपाळी सांगत होता ,
” रोम सारा जळत होता । आणि निरो गात होता “
तसेच —
” राज्य सारे जळत आहे ।
नृत्यात नॉटी दंग आहे
हर्बलाचा अमल हा की ,
कडक गांजा भांग आहे ! “
पण मी म्हणतो ,
आपल्याच मुलीच्या लग्नात बाप नाचला तर लोकांनी त्यात नाक खुपसण्याचं कारण नाही !
आणि ” यांचं हे असं कां होते ” हे ,
त्या पाडगावकरांप्रानेच मलाही काही उमजत नाही !

            कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply