परमवीर सिंह आणि सचिन वाझेंच्या भेटीची होणार पोलीस चौकशी – दिलीप वळसे पाटील

मुंबई : ३० नोव्हेंबर – माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भेटीबाबत मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, की परम बीर सिंग आणि सचिन वाझे यांची भेट झाली. यासंदर्भात चौकशी करणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच माहिती दिली जाईल. न्यायालयीन कोठडीत असताना बाहेरच्या व्यक्तींना भेटणे चुकीचे आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर नसताना सरकारी वाहन वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. परम बीर यांच्या प्रकरणात काल चांदिवाल आयोगासमोर तासभर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply