अमरावतीत हिंदूंना टार्गेट केल्या जात आहे – किरीट सोमय्या

अमरावती : ३० नोव्हेंबर – अमरावती हिंसाचारानंतर काँग्रेस गप्प का आहे? अमरावतीत हिंदूंना टार्गेट केल्या जात आहे. असे म्हणत भापजचे नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेससह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. सोमय्या म्हणाले की, १२ तारखेला हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर येऊच शकत नाही. हिंदूंवर अन्याय झाला तर याची जबाबदारी ठाकरे सरकारची असले. त्यामुळे ठाकरे सरकारने हिंदूच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. असे सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटळे मी बाहेर काढत असल्याने माझ्या अमरावती येण्यावर देखील प्रतिबंध लावण्यात आले होते. मात्र तरीही मी आता अमरावतीत काय घडले याचा पाठपुरावा करण्यासाठी आलो आहे. ठाकरे सरकार पुन्हा 92-93 मध्ये झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती करण्याचे षडयंत्र आखत आहे. असा आरोप देखील सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला.
अमरावती हिंदूंना मुद्दामून टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मी घटनेची माहिती घेण्यासाठी मागेच येणार होतो. मात्र माझ्या जाण्यावर देखील प्रतिबंध लावण्यात आले होते. हिंदूंना मुद्दामून टार्गेट करून, त्याच्यांवर अन्याय केला जात आहे. जर हिंदूंवर अन्याय झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल. असे सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारमधील आतापर्यंत २८ घोटाळे मी बाहेर काढले आहे. पुढच्या काही दिवसात आणखी ४ घोटाळे उघडकीस आणणार आहे. त्यात चार नेते सहभागी असून, त्या चारमध्ये २ नेते शिवसेनेचे आहेत. त्यातील एक ठाकरे सरकारच्या मित्र परिवारातील नेता आहे. मी त्यांचा भांडाफोड करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मी ठाकरे सरकारमधील एकूण ४० घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील सोमय्या यांनी दिला आहे.
आज मी अमरावतीत आलो. यावेळी मला अनेक महिलांनी निवेदने दिली. वेदना व्यक्त केल्या आहे. या महिलांना संरक्षण देण्याची मी सरकारला विनंती करणार आहे. या महिलांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply