घोडेबाजार रोखण्यासाठी नागपुरातील भाजप नगरसेवक सहलीसाठी गोव्याला रवाना

नागपूर : २९ नोव्हेंबर – नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत घोडबाजार होऊ नये, यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना सहलीसाठी गोव्याला रवाना केले आहे. २६ नगरसेवक रात्री एक वाजता विमानाने गोव्याला रवाना झाले. तर उर्वरित नगरसेवक उद्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
नागपूर महापालिकेत भाजपाचे १०८ नगरसेवक असून, पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे मतांच्या बाबतीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षापेक्षा भाजपाचे पारडे जड आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला देखील आपले नगरसेवक पळवण्याची भीती असल्याने काँग्रेसने देखील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झालेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. या निवडणुकीत ५५६ मतदार आहेत. यात सध्या तरी ६० मतांनी भाजपचं पारडं जड आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपकडूनंही दक्षता घेतली जातेय. निवडणूक लढवण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू, आम्ही ४०० पेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकू, असा विस भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केलाय. नागपूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीत एकूण ५५६ मतदार आहेत. यापैकी भाजपकडे ६० मतं जास्त आहेत. मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाने आपल्या २६ नगरसेवकांना गोवा सहलीसाठी रवाना केले आहे.

Leave a Reply