दारूच्या पैशावरून झालेल्या वादात कुख्यात गुंडाचा खून

वर्धा : २८ नोव्हेंबर – स्थानिक बिरसा मुंडा पुतळ्या जवळ गोंडप्लॉट परिसरात दारूच्या पैशावरून धारधार शस्त्राने मनोज धानोरकर याचा खून करण्यात आला. ही घटना आज रविवार २८ रोजी सकाळी उघडकीस आली.
मृतकांच्या अंगावर चाकूने मारले ३० ते ३४ वार होते. दारूच्या पैशाच्या कारणातून असलेल्या जुन्या वादातून खून झाल्याची माहिती आहे. तीन आरोपीना पोलिसांनी काही तासातच केली अटक करण्यात आली. मृतकावर विविध प्रकारचे शहर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. मृतक हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची पोलिसांची माहिती

Leave a Reply