वॉरंट रद्द करण्यासाठी परमवीर सिंह यांची न्यायालयात धाव

ठाणे : २६ नोव्हेंबर – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर गुरुवारी मुंबईत दाखल झाले. परमबीर सिंग काल चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी परमबीर सिंग यांची ६ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. आज परमबीर सिंग आज ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. मात्र दुसरीकडे परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हेगारीचा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. बिल्डर सह बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं त्यांना फरार घोषित केलं होतं. आता हे वॉरंट रद्द करण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं आहे.
परमबीर सिंग यांची ६ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या प्रकरणात डीएसपी नीलोत्पल आणि त्यांच्या टीमने त्याची चौकशी केली आहे. परमबीर सिंग यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. पोलिसांसमोर हजर झाले. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. जिथे गरज असेल तिथे आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. इतर बाबतीतही पूर्ण सहकार्य केले जाईल.
राज्य सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात लूक आउट परिपत्रक जारी केलं आहे. सिंह यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी एक मुंबई, एक ठाण्यात आणि तीन प्रकरणांचा तपास राज्य सीएआय करत आहे. परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारच्या गृह विभागाने ७ सदस्यीय एसआयटी टीमची स्थापना केलीय. या टीमचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करत आहेत.

Leave a Reply