कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध, अमल महाडिक यांचा अर्ज मागे

कोल्हापूर : २६ नोव्हेंबर – अखेर कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपा उमेदवार अमल महाडीक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता, पक्ष श्रेष्ठींच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले होते.
भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे निर्देश आल्याने, महाडिक यांनी पक्षाचा आदेश मान्य करत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता कोल्हापूर विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होत आहे. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंकत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत आता बिनविरोध निवड होणार असल्याचे जवळपास निश्चत आहे.

Leave a Reply