शेतात गांजाची लागवड करणारा पोलिसांच्या ताब्यात

अकोला : २५ नोव्हेंबर – आकोट तालुक्यातील शहानूर गावाजवळील धारूल येथे आपल्या शेतात गांजाची ६ झाडे लावणाऱ्या इसमावर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली असून त्याच्या जवळून गांजाची ६ झाड़े, २७०० ग्राम गांजा सहित ३०,००० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. धारूर शाहनूर शेतशिवारात रामेश्वर तायड़े याने मादक अमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केली असून त्या झाडांचा गांजा काढून तो विक्री करीत आहे अशी माहिती विशेष पोलिस पथकाला त्यांच्या खबर्याकडून मिळाली.
पोलिस पथकाने पंचांना सोबत घेवून रामेश्वर तायड़े याच्या शेतशिवारात छापा मारला असता त्याच्या तेथे ६ गांजाची मोठी झाड़े अंदाजे ५ ते ६ फूट उंचीची झाड़े विनापरवाना लागवड केलेली आढळून आली.व त्याच्या शेतातील घरातही २७०० ग्राम गांजा ज्याची किंमत ३०,००० रूपये आहे.तो विक्री करताना आढळून आल्याने आरोपी रामेश्वर रमेश तायड़े यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोस्टे.मध्ये विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.

Leave a Reply