माकडांच्या भांडणात मंदिराची छत कोसळून एकाचा मृत्यू

वाशिम : २५ नोव्हेंबर – माकडाच्या भांडणात एका व्यक्तीने आपला जीव गमवल्याची दुर्दैवी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. माकडाच्या भांडणामुळेच एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. माकडाच्या भांडणात मंदिराच्या स्लॅब वर एका माकडाने उडी मारल्याने स्लॅबसह मंदिर खाली कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहाच्या वाजताच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराच्या भाजीमंडी जवळील रत्नेश्वर मंदिर संस्थान परिसरात घडली आहे. सुरेश चांदलाल धूत (वय वर्ष ४०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे ते या मंदिर परिसरातील रहिवासी होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरेश धूत हे सकाळी उठून रत्नेश्वर मंदिर परिसरातील खंडू महाराज मंदिरा जवळ दात घासत बसले होते. त्यावेळी मंदिर परिसरात नेहमीच माकडांची वर्दळ असते या वेळी माकडांचे भांडणं सुरु झाले. भांडणा दरम्यान एका माकडाने या मंदिराच्या स्लॅबवर उडी मारली. मंदिर हे खूप जुने व जीर्ण झालेलं आहे. यामुळे माकडाने उडी मारल्याने स्लॅबसह मंदिर खाली कोसळले व खाली बसलेले सुरेश धुत यांच्या अंगावर संपूर्ण मलबा कोसळला यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Leave a Reply