अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंग यांनी लपवला – निवृत्त एसीपींचा आरोप

मुंबई : २५ नोव्हेंबर – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मात्र, आता याच परमबीर सिंग यांच्यावर मुंबईतील निवृत्त एसीपींनी एक खळबळजनक आरोप केला आहे. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेल्या अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंग यांनी लपवल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी केलेल्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात शमशेर खान पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाइल फोन सापड्याचे सांगितले होते. तो फोन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.
दहशतवादी कसाब याला ज्या गिरगाव चौपाटीवर ज्या ठिकाणी पकडलं होतं तेथे परमबीर सिंग हे सुद्धा आले होते. तेव्हा, परमबीर सिंग यांनी तो फोन आपल्या जवळ ठेवला. जो त्या प्रकरणाचे तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता, जेणेकरुन पाकिस्तानी हँडलर आणि इतर कुणी या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता का हे कळू शकले असते.
शमशेर पठाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत म्हटलं, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांनी याबाबत तत्कालीन अॅडिशनल सीपी व्यंकटेश यांना सांगितले की, परमबीर सिंग यांना सांगितले. त्यानंतर माळी हे मोबाइल घेण्यासाठी परमबीर सिंग यांत्याकडे गेले असता परमबीर सिंग यांनी ‘कुठला मोबाइल, गेट आऊट’ म्हणत उत्तर दिलं होतं.
मी सेनेत असताना परमबीर डीसीपी होते आणि ते खूपच भ्रष्ट अधिकारी होते. अजमल कसाब याने दहशतवादी हल्ल्यापूर्वी ज्या-ज्या लोकांशी भारतात संपर्क केला होता. त्या सर्वांना बोलावून परमबीर सिंग याने पैसे घेतले असतील असा आरोपही शमशेर पठाण यांनी दिलेल्या मुलाखातीत केला.

Leave a Reply