वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

राजा उंदीर आणि टोपी

लहानपणी राजा उंदीर आणि टोपीची गोष्ट ऐकली होती ,
त्यात राजाने शेवटी ,” नको ती ब्याद ” म्हणून,उंदराची टोपी फेकून दिली होती !
आणि उंदीर “राजा मला भ्याला ,माझी टोपी दिली”म्हणत नाचत नाचत निघून गेला होता !
पण इकडे दिल्लीतील किसानांचा(?) कबिला मात्र “राजा मला भ्याला ..” ,तर म्हणतो !
पण टोपी मिळाल्यानंतरही तिथेच बसून रहातो !
त्याला राजाने आपल्याला “टोपी घातली ” कि काय ,असा संशय येतो !
पण हा आजचा उंदीर त्या गोष्टीतील उंदरापेक्षा पुर्णपणे वेगळा आहे !
याला फक्त टोपी नाही तर अख्ख सिंहासनच हवं आहे !
काहीही करून या उंदराला राजाला हुसकावून लावायचं आहे !
विशेष म्हणजे, या उंदराला देशातील आणि देशाबाहेरीलही अनेक बोक्याचं पाठबळ आहे !
पण राजाही काही कच्च्या गुरूचा चेला नाही ,
याची त्या उंदरालाही पटली आहे ग्वाही !
राजाने लावलेल्या सापळ्याची मात्र या उंदराला कल्पनाच नाही !
म्हणून तो करतोय आता ,” त्राही ! त्राही ! त्राही !
आता एकच पहायचं उरलं आहे ,कि,
राजा त्या ‘पुंगीवाला आणि उंदीर ” या गोष्टीतल्याप्रमाणे उंदरांना जलसमाधी देतो कि आणखी काही !

        कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply