पोलीस कोठडीतच गुन्हेगाराने केला आत्महत्येचा प्रयत्न

भंडारा : २४ नोव्हेंबर – पोलिस कोठडीत असलेल्या एका आरोपीने कोठडीतील भिंतीवर डोके आदळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भंडारा पोलिस ठाण्यात घडली. जखमी झालेल्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भिस्सी उर्फ विशाल देवेंद्रसिंग तोमर (२७) रा. काजी नगर भंडारा असे आरोपीचे नाव आहे. एका गुन्ह्यासंदर्भात तो भंडारा पोलिस ठाण्यातील कोठडीत होता. रात्री ९ च्या सुमारास कोठडीत त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला काय हवे, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने माझ्या वडिलांना आता भेटायचे आहे, असे बोलून अचानक आपले डोके कोठडीतील भिंतीवर आदळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या कपाळाला दुखापत होऊन रक्त निघू लागले. त्यामुळे त्याला पोलिस बंदोबस्तात वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी भिस्सी तोमर याने पोलिस कोठडीत असताना आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३0९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकुटे करीत आहेत.
नागपूर शहरातील तकीया वॉर्डातील फ्लिपकार्टचे कार्यालय फोडून ६ लाख ४४ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. शहरातील तकीया वॉर्डात फ्लिपकार्टचे कार्यालय आहे. रविवारी संध्याकाळी फ्लिपकार्टचे व्यवस्थापक इशांत देव रा. गणेशपूर हे कार्यालय बंद करुन घरी गेले. दुसर्या दिवशी सकाळी कार्यालयाचे शटर तुटलेले दिसले. कार्यालयातील कॅश लॉकरमध्ये असलेली ६ लाख ४४ हजार ४७३ रुपयांची रोकड चोरुन नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply