पुरावे नाहीत, ऐकीव माहितीवरून गृहमंत्र्यांवर केले आरोप – परमवीर सिंह यांनी मारली पलटी

मुंबई : २४ नोव्हेंबर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या कथित वसुलीचे आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांनी आता पलटी मारली आहे. या प्रकरणात आपल्याकडे काहीही पुरावे नसून ऐकीव माहितीवरून आरोप केल्याचे स्पष्टीकरण परमबीर सिंग यांच्या वकिलांनी चांदिवाल आयोगासमोर दिले आहे. या प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदिवाल आयोगा समोर सुनावणी सुरू आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही. त्यामुळे मी कॅमेरासमोर साक्ष देण्याकरिता येत नाही, असे आयोगासमोर आज परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहयांच्या जुहू येथील घरावर फरार असल्याची नोटीस लावली आहे. मरीन लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणी प्रकरणात सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

Leave a Reply