पराभवानंतर शशिकांत शिंदे समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक

सातारा : २३ नोव्हेंबर – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. तर ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल हा धक्कादायक असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी 58 मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.

Leave a Reply