उद्धव भौ चं दुसरं नाव संजय रौ…- माधव पाटील

2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच दुस-यांदा मुख्यमंत्री होतील असे संजय राऊत यांनी पुण्यात निवडणूक प्रचारा दरम्यान भाषणात टिच्चून सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते केवळ सत्तारूढ भाजपावरच नव्हे तर खुद्द अजित दादा यांच्या ‘घर’ किल्ल्यातहि ते भाषणा तून गरजले. गरजेल ते पडेल काय?ही चलनात असलेली म्हण आपसुकच संधीत रुपांतरीत होते काय ते आता पहायचे बस्स!सद्ध्या तेथे महा नगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांची सत्ता,’मी पुन्हा येणार’या तव्यावर भाजू नये हे ठासून सांगत असताना महा विकास आघाडीतील पुणे सुभ्या-चे मातब्बर(!) राष्ट्रवादीचे नेते अजित दादा यांनीही महा नगर पालिकेच्या तव्यावर आपली पोळी भाजू नये असे सांगायला संजय रौत विसरले नाहीत दादा नीट कान देवून ऐका हो ऐका आम्हांला निवडणुकीच्या विजया—पासून रोखू नका अन्यथा गडबड होईल असा चक्क टोमणाही चष्म्यां–तून डोकावणा-या भुवया उडवत हाणलाच. शिव—सैनिकच ते का नाही हाण णा र बरे हाणलेच पाहिजे नाही का.? कारण आलेल्या संधीचे सोने ते लुटायचे आहे ना,संधीचे सोने न केले तरच नवल…
पुणे तेथे काय उणे असे म्हणत उलट पुणेकर यांना उद्देशुन संजय उवाच बर्ं का पुणेकर ,अहो पुण्याची ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्षांने पावन झालेली आहे. त्यांनीच तर इथली अख्खी जमीन सोन्याचा नांगर जुंपून नांगरुन काढली आहेच. त्यामुळेच तर जे येतील त्या ‘महा’भागा सोबत जे न येतील त्यांच्या (त्यात दादा आलेच)शिवाय शिवसेनेचा भगवा फडक-वूच फडकवू.त्यात आणखी एक मेख अप्रत्यक्ष दादांना मारत,
अन जरा ‘त्या’ पहाटेचे कार्यक्रम विसरा अशा थाटात त्यांनी समज दिली संजय रौ(त) म्हणजे शिव सेनेतले एक बिनधास्त व्यक्तिमत्व.अलीकडे तर राज्यात महा विकास ‘आ’ घाडी चे सरकार अस्तित्वात आल्यापासून तसेच’मौनी’ ‘मुख’मंत्री
म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाले पासून ते ‘संजय उवाच’ म्हणून नावारुपाला आले.एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री शिवसेनेचा आहेच हे ठासून सांगायला कधी विसरले नाहीत.मा.मुख्यमंत्री यांना हि गळपट्टा लागलेला आहे.म्हणून तर त्यांच्या वतीने ‘खास’दार शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून
उद्धव भौ ऐवजी डोलतात,चालतात आणि बोलतात हेहि नसे थोडके

माधव पाटील…….

Leave a Reply