हि शेवटची विधसनसभा भविष्यात मला दिल्लीला न्या – आमदाराची मंचावरच शरद पवारांना मागणी

गडचिरोली : १८ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि गडचिरोलीतील विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मोठी घोषणा करत खळबळ उडवून दिली आहे.‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी भविष्यात दिल्लीत नेण्याची गळ शरद पवार यांना घातली आहे. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम भाजपात जाण्याच्या चर्चा सुरु असताना आता ते राष्ट्रवादीतच लोकसभेसाठी फील्डिंग लावत आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. ‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी थेट शरद पवारांकडेच भविष्यात दिल्लीत नेण्याची मागणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज अर्थात वडसा भागात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आत्राम यांनी थेट मंचावरुनच पवारांना गळ घातली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. सध्या भाजपचे अशोक नेते येथून सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र त्याआधी अनेक वर्ष हा गड काँग्रेसने राखला होता. आता जागावाटपात तो काँग्रेसकडे गेल्यास, धर्मराव बाबा आत्राम कुठून लोकसभा निवडणूक लढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply