विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे निधन

नागपूर : १७ नोव्हेंबर – जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक राम नेवले यांचे मध्यरात्री रात्री १.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७४ होते. त्यांच्यावर आज .१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता. मानेवाडा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे होते. तिथे त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. सुरूवातीला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार असलेले नेवले कालांतराने संघटनेतून बाहेर पडले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यत लढा दिला. नुकतीच त्यांनी महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. “तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,’ यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारन एचटीबीटी बियाण्याची लागवड केली होती.

Leave a Reply