वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

चंद्रपूर : १७ नोव्हेंबर – चिमूर तालुक्यातील मासळ येथील शेतकरी रुपेश गंधारे (घणधरे) हे स्वत:च्या शेतात काम करीत असताना शेतात आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्यानी रुपेश गंधारे यांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागले. त्यामुळे वाघाने त्यांना सोडले. यात ते गंभीर जखमी झाले. लगेच त्यांनी जाणाऱ्या लोकांना माहिती दिली.
वनविभागाला माहिती दिली असता तत्काळ वनविभागाचे पथक दाखल झाले. वाघ हा शेतात दबा धरून बसला होता. त्याला जंगलाकडे पळण्यासाठी वन कर्मचारी व वनमजूर गेले असता त्यांच्यावरसुद्धा वाघाने झडप घातली. यात १३ वनमजूर गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून वनविभागाची गस्त घटनास्थळी सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या ताडोबा बफर झोन अंतर्गत येणार्या पळसगाव वन परिक्षेत्रात येणार्या करबडा शेतशिवरात सदर घटना घडली असून, या परिसरात वाघाचे खूप वावर असतो. तसेही हा परिसर वाघाच्या दहशतीसाठी प्रसिद्ध असून आतापयर्ंत अनेक घटना या परिसरात झाल्या आहेत. ही घटना चिमूर मासळ पलसगाव सिंदेवाही मार्गावरील मासळ, झिल रिसॉर्ट जवळील रुपेश गंधारे या शेतकर्यांच्या शेतात घडली.
सदर पट्टेदार वाघाने काल गंधारे यांच्या शेतात रानडुक्कराची शिकार केली होती, अशी माहिती मिळाली. त्या शिकारीला खाण्यासाठी तिथे वाघाचा वावर असावा. त्याचवेळेस सदर शेतकरी रुपेश गंधारे हा शेतात काम करण्यासाठी गेला असता वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्याने ते गोधळले आणि जीव वाचवण्यासाठी ओरडू लागले. यात चांगली झटापट झाली. वाघाने त्यांच्या हाताला गंभीर जखमी केले. आरडाओरडाने वाघाने गंधारे यांना सोडले आणि शेतात दबा धरून बसला. यानंतर ते कसेबसे रस्त्यावर आले आणि त्यांनी जाणार्या वाटसरूंना माहिती दिली. तेव्हा त्यांनी वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाला हकलण्यासाठी शेतात गेले असता वनमजूर प्रकाश गावडे यांच्यावरसुद्धा वाघाने हल्ला करून जखमी केले. यात त्यांना पोटाला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या.
या दोघांनाही उपचारासाठी चिमूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचा पंचनामा पोलिस विभाग आणि वनविभाग यांनी केला असून, घटनास्थळी वनविभागाचे गस्त पथक ठाण मांडून बसले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Reply