वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

लबाड लांडगे !

कंगना राणावत नावाच्या एका नटीकडून एक चुकीचं वक्तव्य काय झालं,
साऱ्या काँग्रेसी, वाममार्गी नेत्यांनी तिला आधाशी लांडग्याप्रमाणे भक्ष केलं !
“स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे “,हे तिचं वक्तव्य चुकीचेच होते , पण ,
जेव्हा कन्हैय्या आणि त्याचे साथी
” हम क्या चाहते आझादी”,” लडके लेंगे आझादी ” असे नारे लावत होते
ते काय बरोबर होते ?
मग तेव्हा हे सारे गळे फाडून ओरडणारे कोणत्या बिळात लपले होते ?
तेव्हा यांच्यापैकी एकानेही कां केली नाही मागणी त्यांना अटक करण्याची?
त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्याची ?
सत्तेचाळीस साली हेच वाममार्गी म्हणत होते कि, हे खरे स्वातंत्र्य नाही!
हे केवळ भांडवलंदारांचे स्वातंत्र्य आहे!
तेव्हा त्याचा कोणीही कां निषेध केला नाही ?
तसेच गेल्या सत्तर वर्षांपासून तुम्ही “या देशाला स्वातंत्र्य हे गांधीजींनी आणि काँग्रेसने अहिंसेच्या मार्गाने, रक्ताचा थेंबही न सांडता मिळवून दिले ” असा धादांत खोटा प्रचार केला ,तेव्हा तुम्हाला क्रांतिकारकांचा अपमान करताना थोडीही लाज वाटली नाही ?
काँग्रेसच्या आणि गांधीजीच्या जन्माच्याही आधीपासून हा क्रांतिकारकांचा स्वातंत्र्यलढा सुरू आहे, हे काय तुम्हाला ठाऊक नाही ?
त्यांचा अपमान करतांना तुम्हाला शरम वाटली नाही ?
तसेच,
सत्तर वर्षांपासून हिंदूंचाच देशात ज्या हिंदूंना तुम्ही द्वितीय श्रेणीचे नागरिक ठरविले ,
आपल्याच देशात हिंदूंना निर्वासित बनविले ,
त्या हिंदूंना आता कुठे आपण थोडे स्वतंत्र झाल्यासारखे वाटले तर त्यात त्यांचे काय चुकले ?
हिंदूंची स्थिती काय ” गोरे लुटारू इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले ” अशीच झाली नव्हती ?
तसेच, इंग्रज इथून निघून गेल्यानंतरही
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल नेमण्यासाठी नेहरूंनी इंग्लंडच्या राणीची परवानगी मागितली नव्हती ?
मग हे सर्व संदर्भ लक्षात घेऊन जर एखाद्याने असे उद्गार काढले , तर,त्यामागे त्याच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे ,
त्याच्या नावाने शिमगा करण्याची नाही!
सरकारी तिजोऱ्यातून ईमामांचे पगार देणाऱ्यांनी,
आतंकवाद्यांच्या फॅक्टर्यांना म्हणजेच मदरशांना अनुदान देणार्यांनी ,
हिंदूंवर सातत्याने आक्रमण करणाऱ्या मुल्यांना प्रोत्साहन देणार्या लबाड लांडग्यांनी तरी , निदान ,
कंगनाच्या नावाने गळे काढू नये !
आणि आपल्याच हाताने आपली हजामत करून घेऊ नये !

         कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply