नवाब मलिक बेताल व्यक्ती, त्यांना अमरावतीतील कोर्टात खेचणार – अनिल बोंडे

अमरावती : १६ नोव्हेंबर – राज्याचे माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल बोंडे यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केलीय. अमरावतीतील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनिल बोंडे यांना अटकही झाली होती. आज अमरावती न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. यानंतर त्यांनी नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच मुस्लीम समुदायावर गंभीर आरोप केले.
अनिल बोंडे म्हणाले, “मलिक साहेब, हिंदुंना एकत्र करण्यासाठी दारुच्या पैशांची गरज पडत नाही. हर्बल गांजाची तर अजिबात नाही.”
नवाब मलिक बेताल व्यक्ती आहे. त्यांनी माझ्यावर जे आरोप लावले त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे नाही तर मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यांना अमरावती येथील कोर्टात मी खेचणार आहे. अमरावती येथील दुखावलेले नागरिक त्यांचे तंगडे त्यांच्याच गळ्यात टाकणार आहेत,” असंही त्यांनी आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये सांगितलं.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत अनिल बोंडे म्हणाले, “पहाटे ५ वाजल्यापासून माझ्या घराबाहेर २०० पोलिसांनी गराडा टाकला. सकाळी ६ वाजता मला अटक केली. माझ्यासोबत भाजपाच्या १३ कार्यकर्त्यांनाही सर्च ऑपरेशन करून आणलं गेलं. अमरावतीच्या न्यायालयाने आम्हा सर्वांना जामिनावर मुक्त केलं. परंतु नवाब मलिकांसारखा बेताल वक्तव्य करणारा माणूस दारू आणि पैशांचे आरोप करत आहे.”
“१२ नोव्हेंबरला मुस्लिमांनी दंगली भडकावली. दुकाने फोडण्यात आली, नासधुस करण्यात आली. जीविताचीही हानी करण्यात आली, मारहाण करण्यात आली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या मोर्चातून शांततामय मार्गाने बाहेर पडली. परंतु काही मुस्लीम लोकांनी तलवारी काढल्या आणि दगडफेक केली,” असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

Leave a Reply