मामानेच केला भाचीवार अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर : १० नोव्हेंबर – शहरातील कळमना पोलिस ठाणे हद्दीत मामानेच भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलगी कळमना परिसरात वास्तव्याला आहे. सोमवारी तिचे आईवडील कामासाठी घराबाहेर गेले होते. यादरम्यान, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुलीचा मामा घरी आला. त्यावेळी मुलगी घरातील वरच्या माळय़ाच्या खोलीत अभ्यास करीत होती. यावेळी तिची आजी ही अंगणात झाडू लावत होती. संधी बघता मामा हा तिच्या खोलीत गेला. दार ठोठावल्यानंतर मुलीने दार उघडले. मामा आत आल्यानंतर त्याने आतून दरवाजा लावून घेतला आणि ईल चाळे करण्यास सुरुवात केली. मामाच्या अशा कृत्यामुळे मुलीने आरडाओरड केली असता तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसण्यास सांगितले. दरम्यान, मुलीचा आवाज आल्यानंतर आजी ही वरच्या माळय़ावर आली. तिने दार जोरजोरात ठोठावले त्यानंतर मुलीने लगेच दार उघडले. यावेळी आरोपी अर्धग्नावस्थेत दिसून आला. दरम्यान, मुलीने सर्व प्रकार हा आजीला सांगितला. आजीने ही घटना तिच्या आईवडिलांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी कळमना पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Leave a Reply