वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

रंगीला रतन !

राज्यातले शेतकरी अतिवृष्टीने ग्रस्त आहेत !
एस टी चे कर्मचारी पगाराविना त्रस्त आहेत !
रोज त्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या
कानावर आदळत आहेत !
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट अद्याप गेलेलं नाही !
गोरगरीब जनता महागाईने करत आहे त्राही त्राही !
आणि राज्यातला एक रंगीला रतन मंत्री मात्र
दिवाळीच्या पार्ट्या झोडतो आहे !
नटव्या नट्यांबरोबर ठुमके लावत नाचतो आहे !
आधीच्या तीन त्याला कमी पडतात कि काय म्हणून ,
हा लंपट पुन्हा नाविन्याचा शोध घेत आहे !
इतका निर्लज्जपणा , निर्ढावलेपणा याने कुठून बरं कमावला असेल ?
याला जनाची नाही पण मनाचीही काहीच कशी नसेल ?
त्यात आणखी भर म्हणून , हा गल्लीतल्या गुंडांप्रमाणे विरोधकांना
मातीत गाडण्याच्या वल्गनाही करतो !
आणि अशा रीतीने आपली मंत्रिपदासाठीची पात्रताच तो सिद्ध करतो !
मंत्री असावा ऐसा गुंडा !
ज्याचा त्रिलोकात फडकावा झेंडा !

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply