बेवारस श्वानाच्या शेपटीला फटाके बांधून फोडणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

नागपूर : ९ नोव्हेंबर – बेवारस श्वानाच्या शेपटीला फटाके बांधून फोडणार्या एका युवकाला चांगलेच महागात पडले. पशूक्रुरता केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी त्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. जीवन बारई असे (१८) स्मृतीनगर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी जीवन व त्याच्या मित्राने एका बेवारस श्वानाच्या शेपटील फटाके बांधून आग लावण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करताना जीनवच्या मित्राने व्हिडियो तयार केला आणि तो प्रसारमाध्यमांवर अपलोड केला. हा व्हिडियो दिल्ली, मुंबई आणि नागपुरातील पशुप्रेमींनी पाहिला आणि ते संतप्त झाले. नागपूर येथील पीपल्स फॉर अनिमल्स युनिट २ चे आशिष कोहळे, आरएडी बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य आणि स्वप्निल बोधाने यांना देखील समजली. त्यांनी व्हिडियोचा शोध घेतला तो व्हिडियो कोराडी हद्दीतील स्मृतीनगर येथील असल्याचे समजले.
व्हिडियोत दिसणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली. त्याने होकार दिला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी जीवन बारई या मुलावर पशुक्रुरता निवारण अधिनियन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्या श्वानाच्या शेपटील फटाके बांधण्यात आले होते त्या श्वानाचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. पशुचिकित्सक तज्ज्ञांकडून श्वानाची तपासणी केली असता श्वान स्वस्थ असल्याचे लक्षात आले.

Leave a Reply