वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हर्बलजीवी नबाब !

एक हर्बलजीवी नबाब रोज सकाळी उठल्याबरोबर
‘तिकडे'(पाकिस्तानात ) न जाता प्रेसकडे धावतो !
आणि जेम्सबॉण्डचा आव आणून एक नवी पिंक मिडियासमोर टाकतो !
त्याच्या फायद्याची एखादी गोष्ट घडली कि तिचे श्रेय स्वतःच लाटतो !
काल तो बरळला कि, समीर वानखेडेला त्याच्यामुळेच चौकशीपासून दूर केलं !
आणि आपल्या हाताने आपल्याच पाठीवर त्याने थोपटून घेतलं!
हे म्हणजे एखाद्या कावळ्याला वाटावे कि , तो बसला म्हणूनच फांदी तुटली !
किंवा एखाद्या मास्याला वाटावं कि , त्याने सु केल्यामुळेच समुद्राची पातळी वाढली !
किंवा त्या राजा आणि उंदराच्या गोष्टीतील उंदराने म्हणावं कि ,
” राजा मला भ्याला, माझी टोपी दिली ! ” असं झालं !
इतक्याच गंभीरतेने आजकाल लोक या हर्बलजीवी नबाबाला घेतात !
फुकटची करमणूक म्हणूनच
त्याच्याकडे बघतात ! तर
कोणी त्याची ‘ बिच्चारा ‘ म्हणून कीवही करतात !
पण मला वाटते , मंत्र्यांच्या पदावर बसलेल्या माणसाने इतकंही ‘ चिप ‘ होऊ नये !
आणि आपल्याच कृतीने आपलं
माकड बनवून घेऊ नये !

        कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply