राष्ट्रपतींच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरव

नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये २९ महिलांचा समावेश आहे. तर १६ मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कंगनाने यासंदर्भात व्हि़डीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
तसेच, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंधांत बरीच प्रगती झाली. सार्वजनिक सेवेसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply