मी खूप भाग्यवान, वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याची संधी मला मिळाली – नितीन गडकरी

पंढरपूर : ८ नोव्हेंबर – पंढरपूर आळंदी आणि पंढरपूर देहू या पालखी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पालखी मार्गाचे भूमिपूजन करतील. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, “नितिन गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात संतांचे खूप मोठे योगदान आहे. या संतांसाठी पंढरपूर हे विशेष प्रेरणेचे स्थान आहे. पंढरपुरात चार वेळा यात्रा होतात. आषाढीच्या यात्रेत लाखो लोक येतात. अनेक वारकरी पायी या यात्रेत सहभागी होतात. या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग निर्माण करण्याची संधी मला मिळाली मी खूप भाग्यवान आहे.”
“देशात तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक श्रद्धेने जातात. त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड चांगले पाहीजेत, असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक वारसा मजबूत करण्यासाठी काम हाती घेतले आहे”, असे नितिन गडकरी म्हणाले.
“महाराष्ट्रात माहूरचे रेणुका मंदिर, तुळजापूरचे मंदिर, कोल्हापुरची अंबादेवी, संत एकनाथ महाराज यांचे पैठण, शेगांव, शिर्डी हे सगळे भक्तिमार्ग पुर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न केले आहेत. आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकारम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन होत आहे. याचा मला आनंद आहे”, असे गडकरी म्हणाले.

Leave a Reply