मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

होकार….

प्रत्येक व्यक्तीच्या लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या असतात या गाठी या आपल्या आयुष्यात कितपत टिकविता येतात हे या जोडीदाराच्या हातात असतात ही प्रथा आहे मुलगा आणि मुलगी हे लग्न झाल्यावर काही महिने आपल्या करिअर पसंद करतात मग आपल्या अपत्याच्या फॅमिली प्लॅनिंग करतात आणि आपल्या आयुष्यात फक्त एक ठेवतात म्हणजेच हम दो हमारा एक अशी करतात मुलगी असो तरी चालतं
मी आजकाल आपल्या टीव्ही मालिका बघते आणि आपल्या चालू घडामोडी बघितला की त्यांना एक मुलगी आहे ती मुलगी मोठी झाल्यावर मी लग्न झाल्यावर माझ्या आईवडिलांचा पालनपोषण करेल मी सासरी गेल्यावर ते कसे जगतील ही चिंता तिला लागते म्हणून लग्न ठरवताना ती मुलाच्या आई-वडिलांजवळ हा ठराव पास करते मला तर ही कल्पना खूप आवडली समाजात एक मुलगी आहे आणि घरात कमावणारे दुसरा कोणी नाही प्रत्येक मुलीने लग्न ठरवताना हा ठराव पास केला तर प्रत्येक आई वडील आपल्या आयुष्यात सुखी होतील.
पण एक गोष्ट त्या मुलीने तिच्या आई-वडिलांची काळजी पोटी हा ठराव ती पास करते तर लग्न झाल्यावर तिच्या निर्णयावर नाराज न होता तिच्या सासु-सासर्‍यांना तिच्या छळ नको करायला आपल्या मुलीप्रमाणे बघावा तिला घरात हवा तसा मान द्यायला हवा. मुलीला सासरी सगळ्यांच्या इच्छा सांभाळून सगळ्यांचा मान राखून सांभाळून धरावा लागत.
आजच्या युगात स्त्री ही कशातही कमी नाही माझ्या मते तिने हा जो का निर्णय घेतला तो निर्णय फक्त या नवीन युगात स्त्री घेऊ शकते पूर्वी स्त्रीला कुठे एवढा मान होता आजच्या युगात मुलगी झाली की कुटुंबात एक नवीन प्रकारच्या हर्षोल्लास दिसतो मुलगी ही धनाची पेटी असे समजतात.
लग्न झाल्यावर मुलीने आपल्या सासु-सासर्‍यांना आई-वडीलांच प्रमाणे त्यांचा सांभाळ करावा कारण कुटुंब हे तिचा भावी आयुष्य असतात असे त्याला वाटायला हवा तिला जसा आपल्या आई-वडिलांची काळजी वाटते तेच काळजी तिला वाटायला हवी घरात राहताना प्रत्येक व्यक्तीने हे धोरण मनाशी बाळगायच कि या रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात कट कट करून आयुष्य जगायचं की आनंदानं जगायचं. लग्न करून घरात आल्यावर आपल्याजवळ काय नाही हा विचार करू नये पण जे काही आहे त्यात तिने समाधान मानायला हवं. आलेल्या दुःखात दुःख बाजूला करून सुखाचा शोध घ्यायला हवा आणि सर्व बाजूने सकारात्मक विचार करून आपण आणि आपल कुटुंब आनंदी कस राहील याचा विचार तिने नाही तर घरात प्रत्येक व्यक्तीने करायला हवा.

पल्लवी उधोजी

Leave a Reply