प्रियकरानेच केला प्रेयसीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

नागपूर : ८ नोव्हेंबर – नागपूर शहरातील अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीत प्रियकराने प्रेयसीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. सूरज शाहू, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, शहरातील एका हॉटेलमध्ये सूरज हा शेफ म्हणून कामावर आहे. तो आणि पीडिता १९ वर्षीय युवती ही एकाच शाळेत शिकायला होते. त्यामुळे त्यांच्यात ओळखी होती. ती ओळखी प्रेमात परावर्तीत झाली. भेटीगाठी वाढल्या आणि परिसरातील नागरिकांमध्येही त्यांच्या प्रेमाची चर्चा होऊ लागली. अशातच कालांतराने त्यांच्यात ब्रेकअप झाले. दरम्यान, सूरजला दारूचे व्यसन लागले. अशातच तो त्याच्या प्रेयसीला भेटायचा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होता. परंतु, ती सूरजला टाळत होती. सूरजचे वागणे बघत तिने त्याच्याशी बोलणेदेखील बंद केले. परंतु, सूरज पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ती घरी एकटीच असताना सूरज हा घरी आला. त्याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझी आहेस असे सांगत तिची समजूत काढण्यायचा प्रयत्न केला. अशातच तो तिच्या अंगावर धावून आला आणि तिच्याशी शारीरिक संबंधासाठी बळजबरी करू लागला. तिने प्रतिकार केला असता त्याने तिला मारहाण केली. मी तुला सोडणार नाही, असे बोलून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.

Leave a Reply