वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सैतानाशी करार

मार्लो या इंग्लिश नाटककाराचं डॉ. फॉस्टस नावाचं एक पात्र होतं
त्याने जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वशक्तिमान होण्यासाठी
सैतानाशी करार करून देवांशी नातं तोडून टाकलं होतं !
त्याने आपला आत्मा सैतानाकडे गहाण ठेवला होता !
त्या बदल्यात त्याला जगातील सर्व सुखांचा लाभ होणार होता !
पण कराराची मुदत संपल्यानंतर मात्र त्याची रवानगी नरकात होणार होती !
त्यामुळे कराराची मुदत जसजशी संपत आली, तसतशी त्याची अवस्था
वेड्यागत होत होती !
तो देवाचा धावा करू लागला पण ,आता उपयोग नव्हता
सर्व सुखं पायाशी लोळण घेत असताही तो जिवंतपणी नरकयातना भोगत होता!
आपल्या मामुंच्या आजच्या अवस्थेकडे पाहून मला सारखी डॉ.फॉस्टसची आठवण येत आहे !
कारण , मामुंनीही आपला आत्मा म्हणजे आपलं हिंदुत्व सैतानाकडे गहाण टाकलं आहे !
खोटी वचनं, मित्रद्रोह, खंडणीखोरी आदि पापे फेर धरून त्यांच्या भोवती नाचताहेत !
निवडणुका जसजशा जवळ येताहेत तसतशी त्यांची अस्वस्थता प्रचंड वाढत आहे !
आणि एक दिवस त्यांचीही अखेर त्या
डॉ. फॉस्टस प्रमाणेच होणार आहे !

           कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply