७५ वर्षीय वृद्धाने केला २० वर्षीय युवतीवर अत्याचार

नागपूर : ३ नोव्हेंबर – कोंढाळी पोलिस ठाणे हद्दीत धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका ७५ वर्षीय वृद्धाने २0 वर्षीय तरुणीशी अत्याचार केला. यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार करू नये म्हणून आरोपी वृद्धाच्या मुलाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी वृद्धासह तिघांना अटक केली आहे. जावलसिंग असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, नातेवाईकांशी पीडित तरुणीचे होणारे वाद हे नेहमीचेच झाले होते. परिणामी, वादाला त्रासून ही तरुणी घरून निघाली. यानंतर ती आरोपी जावलसिंग यांना भेटली. दरम्यान, जावलसिंगने पीडितेला शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोंढाळी येथे आणले. त्यानंतर त्याने २२ ऑक्टोबरला तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. होणार्या अत्याचाराविरोधात तक्रार केली तर आरोपीचा मुलगा व पुतण्या याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने सबब प्रकरणाची माहिती ही येथील परिसरातील एका नागरिकाला दिली. त्याने तिला धीर देत पोलिसांत तक्रार करण्यास सांगितल्यानंतर तिने कोंढाळी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीसह मुलगा व पुतण्या याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस ४ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply